सर्व पदोन्नत अधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन

10 जून 2014

महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा वर्ग ब (अराप) संघटनेच्या प्रयत्नांना यश लाभले. दि.10 जून 2014 रोजी पदोन्नतीबाबतचे आदेश निर्गमीत झाले आहेत. सर्व पदोन्नत अधिका-यांचे हार्दिक अभिनंदन. आता लवकरच पुढची ऑर्डर !!

अध्यक्ष        
मविलेसे गट ब (अराप)

नियमीत / विनंती बदलीसाठी विकल्प सादर करण्यास मुदतवाढ

12 एप्रिल 2014

महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा वर्ग ब (अराप) यांच्या नियमीत / विनंती बदलीसाठी विकल्प सादर करण्यास दि.30 एप्रिल 2014 पर्यंत मुदतवाढ देण्यास मा.संचालक, लेखा व कोषागारे यांनी सहमती दर्शविलेली आलेली आहे. या संबंधीचे आदेश लवकरच निर्गमीत करण्यात येतील.

अध्यक्ष        
मविलेसे गट ब (अराप)

नव निर्वाचित पदाधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा

04 फेब्रुवारी 2014

संस्थेतील नव निर्वाचित पदाधिकाऱ्यांसाठी दि.22/02/2014 रोजी अधिदान व लेखा कार्यालय, लेखा कोषा भवन, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे(पुर्व) येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे

आमंत्रण पत्रिका

अध्यक्ष        
मविलेसे गट ब (अराप)

नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

31 डिसेंबर 2013

नव वर्ष 2014 आपण सर्वांना सुखमय, आरोग्यदायी, फलदायी व यशदायी जावो ही हार्दिक शुभेच्छा.

केंद्रिय कार्यकारणी         
मविलेसे गट ब (अराप)

जिल्हा कार्यकारणी व विभागीय कार्यकारणी नव्याने नियुक्तीबाबत विनम्र आव्हान

31 डिसेंबर 2013

दि.11 जानेवारी 2014 रोजी औरंगाबाद येथे संघटनेच्या मध्यवर्ती कार्यकारणीची सभा आयोजित करण्यात आलेली आहे. सर्व जिल्हा कार्यकारणी व विभागीय कार्यकारणी नव्याने नियुक्त करावयाचे आहे. त्यासाठी असे आव्हान करण्यात येते की, प्रत्येक जिल्हयाने लेखी स्वरुपात कार्यकारणी नियुक्तीचा प्रस्ताव तसेच प्रत्येक विभागाने लेखी स्वरुपात विभागीय कार्यकारणीचा प्रस्ताव प्रतिनिधी मार्फत केंद्रिय कार्यकारणीच्या मान्यतेसाठी पाठविण्यात यावा. नव्याने निुयक्त करण्यात येणाऱ्या पदाधिकाऱ्याने किमान नियुक्तीचे निकष पुर्ण करणे आवश्यक आहे.

अध्यक्ष         
मविलेसे गट ब (अराप)

पुणे विभागीय बैठक दिनांक 14/12/2013 रोजी सातारा येथे संपन्न

14 डिसेंबर 2013

पुणे विभागांतर्गत उपकोषागार अधिकारी, सहाय्यक लेखाधिकारी / सहाय्यक लेखा परिक्षक अधिकारी यांची विभागीय बैठक श्री. सुनिल जाधव ,कोषाध्यक्ष म.वि.ले.से. गट ब (अराप) महाराष्ट्र राज्य यांचे अध्यक्षते खाली सातारा येथे दिनांक 14/12/2013 रोजी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

बैठकीचे इतिवृत्त

सर्व सभासदांचे हार्दिक आभार

01 डिसेंबर 2013

दि. 01 डिसेंबर 2013 रोजी मुंबई येथे झालेल्या संघटनेच्या रौप्य महोत्सवी अधिवेशनास उपस्थित राहून अधिवेशन यशस्वी केल्याबद्दल सर्व सभासदांचे हार्दिक आभार. -- मुंबई कार्यकारणी.

नवनिर्वाचित कार्यकारणी

01 डिसेंबर 2013

दि. 01 डिसेंबर 2013 रोजी मुंबई येथे झालेल्या संघटनेच्या रौप्य महोत्सवी अधिवेशनात नियुक्त झालेल्या नवनिर्वाचित कार्यकारणीचे हार्दिक अभिनंदन! -- मुंबई कार्यकारणी.

संकेतस्थळाचे उद्घाटन

28 नोव्हेंबर 2013

महाराष्ट्र राज्याचे मा.उप मुख्यमंत्री महोदय, श्री.अजित पवार यांच्या शुभहस्ते दि 28 नोव्हेंबर 2013 रोजी संकेतस्थळाचे उद्घाटन केले व संघटनेच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

श्रम

महाराष्ट्र वित्त व लेखा संवर्गातील अधिकारी हे राज्य शासनाच्या विविध कार्यालयात, महामंडळात कार्यरत आहेत. त्यांना आस्थापना, लेखा व लेखा परिच्छेद साखी महत्वाची कामे करावी लागतात. सहाय्यक लेखा अधिकारी हा कर्मचारी व अधिकारी यांच्या मधील दुवा असतो. त्यांच्या कामाचे स्वरुप खूपच व्यापक आहे प्रतिकुल परिस्थितीतही MFAS परिवारातील ही मंडळी अत्यंत श्रमाने व कार्यकुशलतेने काम करत, आपले कर्तव्य व जबाबदारी पार पाडत असतात.

निष्ठा

महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा संवर्गातील अधिकारी हे राज्य शासनाच्या आर्थिक बाबींवर नियंत्रण ठेवणारे अधिकारी आहेत. वित्तीय अनियमिततेवर निर्बंध ठेवून शासनाच्या निधीचा उपयोग योग्य रितीने होत असल्याची काळजी घेत असतात. MFAS परिवारातील अधिकारी नेहमी एकनिष्ठ राहिलेले आहेत व यापुढे ही एकनिष्ठच राहतील यात शंका नाही.

एकता

MFAS परिवारातील अधिकारी यांनी नेहमीच एकत्र येऊन उडचणींना तोंड देऊन त्यावर मात केलेली आहे. MFAS परिवारातील अधिकारी नेहमीच एकमेकांना व इतरांनाही मदत करण्यासाठी सदैव तत्वर असतात. महाराष्ट्र वित्त व लेखा संवर्ग हा एक परिवारच आहे. MFAS परिवाराच्या यशाचे कारण आहे एकता.

सपंर्क

अधिदान व लेखा कार्यालय,
लेखा कोषा भवन, वांद्रे कुर्ला संकुल,
वांद्रे (पुर्व), मुंबई 400 051.

दुरध्वनी क्र. 9867598659
ई-मेल : info@mfas.in
वेबसाईट :- www.mfas.in