प्रश्नमंच

संगणक अग्रीम घेण्यासाठी कार्यालयीन पध्दत‍ काय आहे

अलमाले प्रफुल्ल

संगणक अग्रीम हे कर्मचाऱ्याला त्यांच्या कार्यालयाकडून मंजूर केले जाते. संगणक खरेदीकरीता भविष्य निर्वाह निधीतून अग्रीम घेता येते किंवा शासनाकडून रु.20000/- संगणक अग्रीम मंजूर केले जाते. संगणक अग्रीमा करीता शासनाने विहित केलेल्या नमुन्यातील अर्ज भरुन द्यावा व त्यासोबत ज्यांच्या कडून संगणक खरेदी करणार असाल त्या विक्रेत्याचे Proforma invoice जोडणे आवश्यक आहे.

मी परिचर पदावर दिनांक 21.08.2006 रोजी शासन सेवेत नियुक्त झालो आहे. विद्यमान वेतनश्रेणी रु.2550-55-2660-60-3200. माझे नविन मुळ वेतन रू.4440 असेल की 4750? कृपया मार्गदर्शन करावे

देवानंद धनुत्तरे

आपण दि. 21.08.2006 रोजी रु.2550-55-2660-60-3200 या वेतन श्रेणीत रुजु झाला आहात. महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारीत वेतन) नियम 2009 मधील विवरणपत्र -तीन नुसार आपले दि.21.08.2006 रोजी रूपये 4440/- इतके वेतन निश्चित होवून रू.1300/- ग्रेड वेतन देय होईल. तद्नंतर पुढील वेतनवाढ दि.01.07.2007 रोजी देय ठरेल.

 

शिपाई पदावरील वेतन रू.5180 आणि ग्रेड पे रु.1300/- असतांना शिपाई पदातून लिपिक पदावर मिळालेल्या पदोन्नतीने वेतन निश्चिती कशी करावी? याबाबत कृपया मार्गदर्शन करावे.

हेमंत घोलप

1) जर पदोन्नती 1जुलै रोजी किंवा त्यानंतर झाली असेल तर विद्यमान पदावरील वेतनात एक काम्पनिक वेतनवाढदेवून वेतन निश्चित करावे.जसे रु. 5180+1300=6480x.03 =194.4=200 म्हणजेच पदोन्नतीच्या दिवशी रु.5380+1900 एवढे वेतन निश्चित होईल.
2) जर पदोन्नती 1जुलै पुर्वी झाली असेल तर कर्मचाऱ्याकडून 1984 च्या शासन निर्णयान्वये विकल्प घेवून वेतन निश्चिती करावी लागेल. अशी वेतन निश्चिती करतांना प्रथम पदोन्नतीच्या दिनांकास वेतन रु.5200+1900ग्रेड वेतन मंजूर करावे. तद्नंतर वेतनवाढीच्या दिनांकास म्हणजेच माहे जुलै मध्ये‍ शिपाई पदावरील वेतनात एक नियमित वेतनवाढ देण्यात यावी तद्नंतर त्यात एक काल्पनिक वेतनवाढ देवून वेतन निश्चिती करावे. जसे ,
5180+1300=6480x.03 =200 ही नियमित वेतनवाढ = वेतन 5180+200= 5380
5380+1300=6480x.03 =200 ही काल्पनिक वेतनवाढ = वेतन 5380+200= 5580
1 जूलै रोजी निश्चित होणारे वेतन रु.5580+1900 ग्रेड वेतन.

 

माझी प्रथम नियुक्ती जलसंपदा विभागात दि.31.03.2010 रोजी गोंदिया जिल्हयामध्ये झालेली आहे. सदरच जिल्हा हा पुर्णपणे नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे. माझे पदनाम दप्तरी कारकुन वेतनबँड 5200-20200 ग्रेड पे 1900 असा आहे. कृपया माझ्या वेतन निश्चिती बाबत मार्गदर्शन व्हावे.

संदिप भिवगाडे

1) दि.31.03.2010 रोजी कारकुन वेतनबँड 5200-20200 ग्रेड पे 1900 मध्ये निश्चित 5830 + ग्रेड पे 1900
2) आपले पदोन्नतीच्या पदाचा वेतनबँड रु.5200-20200 ग्रेड पे 2400 असेल, तर सा.प्र.वि. शासन निर्णय दि.06.08.2002 मधील अ.क्र.7 अनुसारआपली वेतन निश्चिती रु.5830+1900=7730*3%=240 काल्पनिक वेतनवाढ देवून दि.31.03.2010 रोजी एकस्तर पदावर निश्चित होणारे वेतन रु.6070+ग्रेड पे 2400/- असे होईल. पुढील वेतनवाढ दि.01.07.2011 रोजी देय राहील.

 

श्रम

महाराष्ट्र वित्त व लेखा संवर्गातील अधिकारी हे राज्य शासनाच्या विविध कार्यालयात, महामंडळात कार्यरत आहेत. त्यांना आस्थापना, लेखा व लेखा परिच्छेद साखी महत्वाची कामे करावी लागतात. सहाय्यक लेखा अधिकारी हा कर्मचारी व अधिकारी यांच्या मधील दुवा असतो. त्यांच्या कामाचे स्वरुप खूपच व्यापक आहे प्रतिकुल परिस्थितीतही MFAS परिवारातील ही मंडळी अत्यंत श्रमाने व कार्यकुशलतेने काम करत, आपले कर्तव्य व जबाबदारी पार पाडत असतात.

निष्ठा

महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा संवर्गातील अधिकारी हे राज्य शासनाच्या आर्थिक बाबींवर नियंत्रण ठेवणारे अधिकारी आहेत. वित्तीय अनियमिततेवर निर्बंध ठेवून शासनाच्या निधीचा उपयोग योग्य रितीने होत असल्याची काळजी घेत असतात. MFAS परिवारातील अधिकारी नेहमी एकनिष्ठ राहिलेले आहेत व यापुढे ही एकनिष्ठच राहतील यात शंका नाही.

एकता

MFAS परिवारातील अधिकारी यांनी नेहमीच एकत्र येऊन उडचणींना तोंड देऊन त्यावर मात केलेली आहे. MFAS परिवारातील अधिकारी नेहमीच एकमेकांना व इतरांनाही मदत करण्यासाठी सदैव तत्वर असतात. महाराष्ट्र वित्त व लेखा संवर्ग हा एक परिवारच आहे. MFAS परिवाराच्या यशाचे कारण आहे एकता.

सपंर्क

अधिदान व लेखा कार्यालय,
लेखा कोषा भवन, वांद्रे कुर्ला संकुल,
वांद्रे (पुर्व), मुंबई 400 051.

दुरध्वनी क्र. 9867598659
ई-मेल : info@mfas.in
वेबसाईट :- www.mfas.in